सवाल-जवाब हा सादर केल्या जाणाऱ्या कवित्वात मला वाटतं सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. मग ते लावणीच्या फडावरचे असोत की कव्वालीच्या महफिलीतले असोत, फार दिलचस्प मामला असतो नाही का?
दोन तुल्यबल प्रतिस्पर्ध्यांमधल्या सवाल जवाबातलं नाट्य काही औरच. बरसात की रात मधलं इश्क इश्क है इश्क इश्क आठवतंय ना? तुमच्या आवडीचे सवाल - जवाब कोणते ते मला comments मध्ये सांगा.
अश्या एका अनोख्या द्वंद्वाने रंगली आहे अमीर खुस्रोची(असावी) ही फारसी गजल.
गुफ़्तम कि रौशन अज क़मर गुफ़्ता कि रुख़्सार-ए-मनस्तअश्विन आफ़्राद ने या गजलचा जिक्र केल्यावर मी ती लगेच ऐकली. मला नशाच चढला तिचा. हे आशिक आणि माशुक यांच्यात चाललेले सवाल जवाब आहेत. ह्या एकाच ओळीत सवाल आणि जवाब दोन्हीही, त्यामुळे, ओळीच्या मध्ये एक स्वाभविक विराम, ज्याने त्या दोन ओळी वाटतात. ह्या रचनेने सवाल आणि जवाबात एक terseness आहे. थोडेच शब्द आहेत दोघांकडेही प्रश्न विचारायला आणि उत्तर द्यायला. त्यामुळे दोन्हीला एक वेग आहे, बंदूकीच्या गोळ्या चालाव्यात तश्या. एक खेळकरपणा आहे.
पुरेशी गुणगुणून, समजून झाल्यावर तिचं रुपांतर करायची खुमखुमी मला आली. अर्थात माझी फारसी - उर्दू - हिंदी भाषांची समज फार फार तोकडी आहे. पण आता खुम्खुमीच आली म्हटल्यावर इलाज नाही. तर हे तमाम आफ़ताब-ओ-महताब के सामने जुगनु का चमकना है|
आधी भाषांतर वाचा मग आपण त्याचा कीस पाडू.
| मैने कहा रोशन चांदसा? उसने कहा चेहरा मेरा मैने कहा गुड सी मिठी उसने कहा बोली मेरी | गुफ़्तम कि रौशन अज़ क़मर गुफ़्ता कि रुख़्सार-ए-मनस्त गुफ़्तम कि शीरीं अज़ शकर गुफ़्ता कि गुफ़्तार-ए-मनस्त | ||
| -- | -- | ||
| मैने कहा नुस्खा ए आशिकी? उसने कहा वफ़ादारी करो मैने कहा न कर जुल्मो सितम उसने कहा मुमकीन नही उसने कहा ये काम मेरा | गुफ़्तम तरीक़-ए-आ’शिकाँ गुफ़्ता वफ़ादारी बुवद गुफ़्तम मकुन जौर-ओ-जफ़ा गुफ़्ता कि ईं कार-ए-मनस्त |
||
| -- | -- | ||
| मैने कहा आशिकोंकी मौत उसने कहा जुदाई मेरी मैने कहा इलाज-ए-जिंदगी उसने कहा दीदार मेरा | गुफ़्तम कि मर्ग-ए-आ’शिकाँ गुफ़्ता कि दर्द-ए-हिज्र-ए-मन गुफ़्तम इ’लाज-ए-ज़िंदगी गुफ़्ता कि दीदार-ए-मनस्त |
||
| -- | -- | ||
| मैने कहा बहार हो या खिजॉं उसने कहा जलतें हैं वो मैने कहा चकोर शर्मा गया उसने कहा ठुमकनेसे मेरे | गुफ़्तम बहारी या ख़िज़ाँ गुफ़्ता कि रश्क-ए-हुस्न-ए-मन गुफ़्तम ख़जालत कब्क रा गुफ़्ता कि रफ़्तार-ए-मनस्त |
||
| -- | -- | ||
| मैने कहा हुर हो या परी उसने कहा मलिका-ए-जन्नत हुं मैं मैने कहा 'खुस्रो'-कमजोर है उसने कहा परवाना मेरा | गुफ़्तम कि हूरी या परी गुफ़्ता मनम शाह-ए-बुताँ गुफ़्तम कि 'ख़ुसरौ'-ए-ना-तवाँ गुफ़्ता परस्तार-ए-मनस्त |
ही गजल सहित्यिक किंवा तत्वज्ञान दृष्टया फार काही खास नाही. तिची सगळी मजा तिच्यातल्या नोक झोक मध्ये आहे.
मैने कहा - उसने कहा ह्या form ने ही नोक झोक छान वठते. ह्या फ़ोर्म मधली अजुन गाणी आठवली का तुम्हाला?
एक तर कवाली - उसने कहा तू कौन है? मैने कहा मंगता तेरा. ह्याचा एक तुकडा "परी हो आसमानी तुम" या टिपीकल नासीर हुसेनी(!) चित्रपट कव्वालीत आहे. माझं भाषांतर थोडी सवलत घेत या चालीत बसवता येतं :)
अजुन एका गाण्यात पण ह्या ओळी आहेत - सांगू शकता?
ह्याची mirror ओळ आठवली ना तुम्हाला - मैने कहा तू कौन है? उसने कहा .....
आवारगी!
फारसी आणि उर्दू गज़लांचं वैशिष्ट्य आहे, की त्यात माशुकचे gender defined नसतं. मी ते कायम ठेवण्याचा प्रयत्न केलाय. other than मलिका-ए-जन्नत - पण प्रश्न पण हूर या परी असा आहे.
काही अर्थांचे deviations घेतले आहेत मी - पण या शब्दात जास्त मजा आहे - फार liberty न घेता. :)
काफिया आणि रदीफ काही जमले नाही पण मेरा/ मेरी हे मनस्त साठी ठेवलंय - एक अपवाद - पण तो परत effect साठी.
शायर शेर form मध्ये मानी ( अर्थ ) आणण्यासाठी वेगवेगळे तरीके वापरतात. त्यातला एक असतो की काही phrases चे एकापेक्षा अधिक अर्थ असू शकतात. शायर ते जाणून बुजून वापरतो, आणि त्याने निर्माण होणाऱ्या शक्यता दिलचस्प असतात.
ह्या गजलमधले हे दोन नमुने पहा.
| मैने कहा 'खुस्रो'-कमजोर है उसने कहा परवाना मेरा |
पण "खुस्रो कमजोर असणं शक्यच नाही! तो माझा परवाना आहे! असंही उत्तर माशुक देऊ शकेल.
मैने कहा इलाज-ए-जिंदगी
उसने कहा दीदार मेरा
उसने कहा दीदार मेरा
इलाज - ए- जिंदगी - चा अर्थ जिंदगीचा इलाज म्हणजे डायबिटीस चा इलाज स्साारखा घ्यायचा का जिंदगी राहावी म्हणून इलाज असा घ्यायचा? दोन्हीला दिदार मेरा उत्तर योग्यच आहे.
यावर गालीबचा एक शेर अर्ज है
ग़म-ए-हस्ती का 'असद' किस से हो जुज़ मर्ग इलाज
शम्अ हर रंग में जलती है सहर होते तक
ग़म-ए-हस्ती का 'असद' किस से हो जुज़ मर्ग इलाज
शम्अ हर रंग में जलती है सहर होते तक
याने
जगण्याच्या दुखाचा मरण सोडून काय इलाज?
शमा अनेक रंगात तेवते पहाटेपर्यंत
Comments
Post a Comment