शंकराचार्यांनी लिहिलेली स्तोत्रे ही संस्कृत भाषेची आभुषणं आहेत. ही स्तोत्र, देवतेचे वर्णन केवळ शब्दानेच करत नाहीत तर त्या स्तोत्राचे स्वरूपही देवतेच्या भावाला सजेसे असते. मुदाकरात्त मोदकम् ची संथ चाल बघा अथवा शिवतांडव स्तोत्राची रुद्रगंभीर कडवी ऐका.
अयि गिरीनंदिनी अथवा 'जटाटवि' हे लांबलचक आकाराने आणि लयीने उग्र वाटतात. मनीषापंचक, निर्वाणषटक त्यांच्यातल्या अद्वैतचर्चेने गंभीर आहेत. यापेक्षा वेगळे असे शंकराचार्यांचे अर्धनारीश्वर स्तोत्र मला फार आवडते. आठ श्लोकांचे शिवा आणि शिव यांचे वेगळेपण आणि तरिही त्यांचे अद्वैत रेखीवपणे उभे करते.
प्रत्येक श्लोकाच्या पहिल्या ओळीचा प्रथम अर्ध शिवानीचं वर्णन करतो तर द्वितिय अर्ध शिवाचं. दुसऱ्या ओळीच्या पहिल्या अर्धाचे परत असेच दोन भाग, पहिला शिवेचा दुसरा शिवाचा.
नमः या क्रियापदाला चतुर्थीची अपेक्षा असल्याने, शिवेची शब्दरुपे 'यै' कारान्त तर शिवाची 'य' कारान्त.
झणत्क्वणत्कङ्कणनूपुरायै पादाब्जराजत्फणिनूपुराय ।
हेमाङ्गदायै भुजगाङ्गदाय नमः शिवायै च नमः शिवाय ॥ ३ ॥
चाम्पेयगौरार्धशरीरकायै कर्पूरगौरार्धशरीरकाय ।
धम्मिल्लकायै च जटाधराय नमः शिवायै च नमः शिवाय ॥ १ ॥
धम्मिल्लकायै च जटाधराय नमः शिवायै च नमः शिवाय ॥ १ ॥
गौरीचा वर्ण चाफ्यासारखा सोनमाखला गोरा, तर शिव कर्पूरगौर.
देवींची केषभुषा मनोहारी तर देव जटाधर
कस्तूरिकाकुङ्कुमचर्चितायै चितारजःपुञ्जविचर्चिताय ।
कृतस्मरायै विकृतस्मराय नमः शिवायै च नमः शिवाय ॥ २ ॥
कृतस्मरायै विकृतस्मराय नमः शिवायै च नमः शिवाय ॥ २ ॥
अम्बा कस्तुरी कुंकू ल्यायलेल्या, तर शिव चिताभस्माने माखलेले
अम्बेचे रुप सुंदर (कृत - जगाच्या सौंदर्यकल्पनेला अनुरुप) तर शिवाचं अद्भुत (विकृत - चिताभस्म, जटाजुट, भुजंगमाला - असं सगळंच विपरीत)
झणत्क्वणत्कङ्कणनूपुरायै पादाब्जराजत्फणिनूपुराय ।
हेमाङ्गदायै भुजगाङ्गदाय नमः शिवायै च नमः शिवाय ॥ ३ ॥
पार्वतीचे रुणझुण करणारे कंकण - पैंजण, तर महादेवाच्या पायी नागराजच जणु नूपुर बनले आहेत.
तिचा बाजुबंद सोन्याचा, तर त्याच्या भुजांवर भुजंग रुळताहेत.
विशालनीलोत्पललोचनायै विकासिपङ्केरुहलोचनाय ।
समेक्षणायै विषमेक्षणाय नमः शिवायै च नमः शिवाय ॥ ४ ॥
समेक्षणायै विषमेक्षणाय नमः शिवायै च नमः शिवाय ॥ ४ ॥
उमेचे नेत्र निलोत्पलासम विशाल, तर महेश्वराचे लोचन पूर्ण विकसित कमळासारखे.
दोन डोळ्याने कृपावर्षाव करणारी ती, तर तिसऱ्या डोळ्याचा प्रताप दाखवू शकणारा तो.
मन्दारमालाकलितालकायै कपालमालाङ्कितकन्धराय ।
दिव्याम्बरायै च दिगम्बराय नमः शिवायै च नमः शिवाय ॥ ५ ॥
दिव्याम्बरायै च दिगम्बराय नमः शिवायै च नमः शिवाय ॥ ५ ॥
अपर्णेच्या कपाळावर रुळणाऱ्या बटा मंदारमालेने सुशोभित आहेत, तर शंकराने गळ्यात रुंडमाळा धारण केल्या आहेत.
देवीने दिव्य वस्त्र परिधान केले आहे तर भगवान दिगंबर आहेत.
अम्भोधरश्यामलकुन्तलायै तडित्प्रभाताम्रजटाधराय ।
निरीश्वरायै निखिलेश्वराय नमः शिवायै च नमः शिवाय ॥ ६ ॥
जलधर ढगांप्रमाणे काळा केशसंभार मिरवणाऱ्या महादेवी, तर कडाडणाऱ्या विजेसारख्या ताम्रवर्ण जटाधारी महादेव.
महादेवींपेक्षा कोणी वरचढ नाही अर्थात त्या स्वतः ईश्वरी आहेत, तर विश्वनाथ समस्त चराचराचे ईश्वर आहेत.
असे हे दोघे इतके भिन्न तरीही अद्वैत.
प्रपञ्चसृष्ट्युन्मुखलास्यकायै समस्तसंहारकताण्डवाय ।
जगज्जनन्यै जगदेकपित्रे नमः शिवायै च नमः शिवाय ॥ ७ ॥
प्रपंचाच्या उत्पत्तीस कारण तिचे लास्य, तर समस्त संहार करणारे त्याचे तांडव
ती जगन्माता तो जगत्पिता.
प्रदीप्तरत्नोज्ज्वलकुण्डलायै स्फुरन्महापन्नगभूषणाय ।
शिवान्वितायै च शिवान्विताय नमः शिवायै च नमः शिवाय ॥ ८ ॥
भवानीचे कुंडल दैदिप्यमान रत्नांचे आहे. फुत्कारणारे नाग हेच भैरवाचे आभुषण आहे.
शिवानी शिवाने मंडित आहेत, शिव शक्ति समन्वित. दोन नव्हेत एकच ते.
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यस्य श्रीगोविन्दभगवत्पूज्यपादशिष्यस्य
श्रीमच्छंकरभगवतः कृतौ अर्धनारीश्वरस्तोत्रम् संपूर्णम् ॥
हे पहा ज्ञानेश्वर माऊली अमृतानुभवाच्या शिवशक्तीसमावेशन या प्रथम प्रकरणात ह्याच अद्वैताचं गुढ सांगतात.
जयां येक सत्तेचें बैसणें । दोघां येका प्रकाशाचें लेणें ।
जें अनादि येकपणें । नांदती दोघें ॥ १-८ ॥
जेणें देवें संपूर्ण देवी । जियेविण कांहीं ना तो गोसावी ।
किंबहुना येकोपजीवी । येकयेकांची ॥ १-१० ॥
जें अनादि येकपणें । नांदती दोघें ॥ १-८ ॥
जेणें देवें संपूर्ण देवी । जियेविण कांहीं ना तो गोसावी ।
किंबहुना येकोपजीवी । येकयेकांची ॥ १-१० ॥
*वरची अर्धनारीश्वराची मुर्ती रावण गुंफा अइहोळे इथली आहे.
*शेजारची मुर्ती ही ओरीसा स्टेट म्युसियम भुवनेश्वर मधली आहे


Comments
Post a Comment