Skip to main content

Posts

सवाल जवाब

  सवाल-जवाब हा सादर केल्या जाणाऱ्या कवित्वात मला वाटतं सर्वात लोकप्रिय प्रकार आहे.  मग ते  लावणीच्या फडावरचे असोत की कव्वालीच्या महफिलीतले असोत, फार दिलचस्प मामला असतो नाही का?  दोन तुल्यबल प्रतिस्पर्ध्यांमधल्या सवाल जवाबातलं नाट्य काही औरच.  बरसात की रात मधलं इश्क इश्क है इश्क इश्क आठवतंय ना? तुमच्या आवडीचे सवाल - जवाब कोणते ते मला comments मध्ये सांगा.  अश्या एका अनोख्या द्वंद्वाने रंगली आहे अमीर खुस्रोची(असावी) ही फारसी गजल.  गुफ़्तम कि रौशन अज क़मर गुफ़्ता कि रुख़्सार-ए-मनस्त अश्विन आफ़्राद ने   या गजलचा जिक्र केल्यावर मी ती लगेच ऐकली. मला नशाच चढला तिचा. हे आशिक आणि माशुक यांच्यात चाललेले सवाल जवाब आहेत. ह्या एकाच ओळीत सवाल आणि जवाब दोन्हीही, त्यामुळे, ओळीच्या मध्ये एक स्वाभविक विराम, ज्याने त्या दोन ओळी वाटतात. ह्या रचनेने सवाल आणि जवाबात एक terseness आहे.  थोडेच शब्द आहेत दोघांकडेही प्रश्न विचारायला आणि उत्तर द्यायला. त्यामुळे दोन्हीला एक वेग आहे, बंदूकीच्या गोळ्या चालाव्यात तश्या. एक खेळकरपणा आहे.  पुरेशी गुणगुणून, समजून झाल्...
Recent posts

अर्धनारीश्वर स्तोत्र

 शंकराचार्यांनी लिहिलेली स्तोत्रे ही संस्कृत भाषेची आभुषणं आहेत.  ही स्तोत्र, देवतेचे वर्णन केवळ शब्दानेच करत नाहीत तर त्या स्तोत्राचे स्वरूपही देवतेच्या भावाला सजेसे असते. मुदाकरात्त मोदकम्‌ ची संथ चाल बघा अथवा शिवतांडव स्तोत्राची रुद्रगंभीर कडवी ऐका.  अयि गिरीनंदिनी अथवा 'जटाटवि' हे लांबलचक आकाराने आणि लयीने उग्र वाटतात. मनीषापंचक, निर्वाणषटक त्यांच्यातल्या अद्वैतचर्चेने गंभीर आहेत. यापेक्षा वेगळे असे शंकराचार्यांचे अर्धनारीश्वर स्तोत्र मला फार आवडते. आठ श्लोकांचे शिवा आणि शिव यांचे वेगळेपण आणि तरिही त्यांचे अद्वैत रेखीवपणे उभे करते.  प्रत्येक श्लोकाच्या पहिल्या ओळीचा प्रथम अर्ध शिवानीचं वर्णन करतो तर द्वितिय अर्ध शिवाचं. दुसऱ्या ओळीच्या पहिल्या अर्धाचे परत असेच दोन भाग, पहिला शिवेचा दुसरा शिवाचा.  नमः या क्रियापदाला चतुर्थीची अपेक्षा असल्याने, शिवेची शब्दरुपे 'यै' कारान्त तर शिवाची 'य' कारान्त.  चाम्पेयगौरार्धशरीरकायै कर्पूरगौरार्धशरीरकाय । धम्मिल्लकायै च जटाधराय नमः शिवायै च नमः शिवाय ॥ १ ॥ गौरीचा वर्ण चाफ्यासारखा सोनमाखला गोरा, तर शिव कर्पूरगौर.  ...