सवाल-जवाब हा सादर केल्या जाणाऱ्या कवित्वात मला वाटतं सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. मग ते लावणीच्या फडावरचे असोत की कव्वालीच्या महफिलीतले असोत, फार दिलचस्प मामला असतो नाही का? दोन तुल्यबल प्रतिस्पर्ध्यांमधल्या सवाल जवाबातलं नाट्य काही औरच. बरसात की रात मधलं इश्क इश्क है इश्क इश्क आठवतंय ना? तुमच्या आवडीचे सवाल - जवाब कोणते ते मला comments मध्ये सांगा. अश्या एका अनोख्या द्वंद्वाने रंगली आहे अमीर खुस्रोची(असावी) ही फारसी गजल. गुफ़्तम कि रौशन अज क़मर गुफ़्ता कि रुख़्सार-ए-मनस्त अश्विन आफ़्राद ने या गजलचा जिक्र केल्यावर मी ती लगेच ऐकली. मला नशाच चढला तिचा. हे आशिक आणि माशुक यांच्यात चाललेले सवाल जवाब आहेत. ह्या एकाच ओळीत सवाल आणि जवाब दोन्हीही, त्यामुळे, ओळीच्या मध्ये एक स्वाभविक विराम, ज्याने त्या दोन ओळी वाटतात. ह्या रचनेने सवाल आणि जवाबात एक terseness आहे. थोडेच शब्द आहेत दोघांकडेही प्रश्न विचारायला आणि उत्तर द्यायला. त्यामुळे दोन्हीला एक वेग आहे, बंदूकीच्या गोळ्या चालाव्यात तश्या. एक खेळकरपणा आहे. पुरेशी गुणगुणून, समजून झाल्...